INR 450

Maharashtra Rajpatrit Tantrik Seva – Sanyukt Purva Pariksha MPSC technical books &( Maharashtra gazetted technical service )

1 of
Previous Next

Ad Details

  • Ad ID: 1900

  • Added: July 26, 2022

  • Sale Price: INR 450

  • Condition: Brand New

  • Location: India

  • Views: 7

Description

या वर्षापासून वनक्षेत्रपाल (गट ब); उपसंचालक, कृषी व इतर (गट अ); तालुका कृषी अधिकारी (गट ब); कृषी अधिकारी कनिष्ठ (गट ब); सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य (गट अ); सहायक अभियंता, स्थापत्य (गट अ); सहायक अभियंता, स्थापत्य (गट ब); सहायक अभियंता, यांत्रिकी (गट ब); सहायक अभियंता, विद्युत (गट ब); उपविभागीय जलसंधारण अधिकारी, स्थापत्य (गट अ) आदी पदांसाठी एकत्रितरीत्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जात आहे. या पदांच्या मुख्य परीक्षा (प्रत्येकी ४०० गुण) खातेनिहाय स्वतंत्रपणे घेतल्या जाणार आहेत. . महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेत आपणास मराठी, इंग्रजी व सामान्य क्षमता चाचणी (बुद्धिमापन चाचणीसह) या तीन विषयांचा व एकूण १०० प्रश्नांचा समावेश असलेल्या २०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा सामना करावयाचा आहे. नकारात्मक गुणदान असल्याने सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. या परीक्षेतील सामान्य क्षमता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम इतर परीक्षांच्या तुलनेत काहीसा वेगळा असल्याने अस्मादिकांनी आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना केली आहे. ही रचना करताना सामान्य क्षमता चाचणीतील समाविष्ट घटक विद्यार्थ्यांना मुळातूनच समजावेत, यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या संदर्भाची रचना करताना मुद्दे, तक्ते, आराखडे व नव्या धर्तीचे थेट वस्तुनिष्ठ प्रश्न दिले असून विषय समजून घेऊन, थोडक्या पानांत विद्यार्थ्यांची विषयाची व्यापक व विस्तृत तयारी होईल, यावर भर दिला आहे.

Comments

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked. *

Success! Thanks for your comment. We appreciate your response.
You might have left one of the fields blank, or be posting too quickly